Click Here...👇👇👇

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यातर्फे मृतकांच्या कुटुंबीयास आर्थिक मदत. #Help

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
घुग्घुस:- 19 ऑगस्ट रोजी अमराई येथील मृतकांच्या कुटुंबियांची भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी भेट घेऊन विचारपूस केली व सांत्वना देऊन आर्थिक मदत दिली.#Adharnewsnetwork


याप्रसंगी या संदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी कुटुंबियांच्या समक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याशी भ्रमनध्वनीवरून चर्चा केली या प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
घुग्घुस येथील अमराई वार्ड क्र.1 येथे राहणारे सुरज माने व रत्नमाला माने या दाम्पत्याचा एकाच दिवशी मृत्यू झाला त्यांची आयुष व आर्यन लहान दोन मुल आहे आई वडिलांचे छत्र हरपल्याने ते अनाथ झाले आहे.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते भारत साळवे, सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या संचालिका सुनंदा लिहीतकर, विनोद चौधरी, हेमंत उरकुडे, अमोल थेरे, स्वप्नील इंगोले, गंगाधर गायकवाड, विनोद जंजार्ला, वमशी महाकाली, राजू गोड्डू, दयाराम गुलाबचंद उपस्थित होते.#Help