Top News

ऑनलाइन सट्टा कारवाईत पुन्हा नव्या 18 आरोपींचे नाव समोर. #Speculation


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- पोलिसांनी ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. सध्या सुरू असलेले ऑलम्पिक खेळावर सुद्धा गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात ऑनलाइन मार्फत सट्टा सुरू असतो, या सट्ट्याची उलाढाल हजार ते 2 हजार कोटींच्या घरात आहे.#Speculation #Adharnewsnetwork

देशात ऑनलाइन जुगार प्रतिबंधित आहे मात्र छुप्या मार्गाने अँड्रॉइड एप बनवून ती मोबाईल मध्ये सहज डाऊनलोड करण्यात येते. यामध्ये Betx. co, Nice 777 net या बेकायदेशीर साईटच्या माध्यमातून कोट्यवधींचा जुगार खेळला जात आहे. या रॅकेटच मुख्य तार हे चंद्रपूर, नागपूर, तेलंगणा, वणी व गडचिरोली जिल्ह्यात जुळलं आहे.

सध्या गडचिरोली पोलिसांनी आष्टी येथील छगन मठले, राजू धर्माडी , मनोज अडेट्वार, द्राव्यराव चांदेकर , सुमित नगराळे आणि अहेरी आलापल्ली परिसरातील सुरेंद्र शेळके, संदिप गुदप्पवार यांना चौकशी करता बोलवले, चौकशीमध्ये चंद्रपूर येथील राकेश कोंडावार , रजीक अब्दुल खान , महेश अल्लेवार हे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये या बेकायदेशिर ऑनलाईन सट्टा प्लॅटफार्मचे ते युजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातुन एजंट / क्लायंट तयार करतात अशी माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

10 आरोपींना अटक केल्यावर 4 ऑगस्ट पर्यंत आरोपी पैकी काही जणांनी पोलिसांना खळबळजनक माहिती दिली आहे, यामध्ये चंद्रपूर, नागपूर, सिरोंचा व तेलंगणा मधील काही आरोपींची नावे समोर आली आहे.

यामध्ये आलापल्ली येथील इम्रान, राकेश, चंद्रपूर येथील विजय, विशाल, राकेश, अविनाश, अंकित, पारस, सुधाकर, महेश व प्रदीप, सिरोंचा येथील संदीप, महेश व गणेश, नागपूर जिल्ह्यातील मनीष, रामू व तेलंगणा येथील वाजीद यांचा समावेश आहे. गडचिरोली पोलीस या 18 आरोपींच्या मागावर असून लवकरच या सर्वांना अटक करणार आहे.

सदरील आरोपींना अटक झाल्यावर पुन्हा नव्याने काही नाव पुढे येणार काय? याचा सखोल तपास गडचिरोली पोलीस नक्कीच करतील. विशेष म्हणजे गडचिरोली पोलिसांच्या या कारवाईमुळे चंद्रपुरातील ऑनलाइन सट्टा खेळणारे चंद्रपुरातुन पसार झाले आहे, लॉटरीचे जुने व्यवसायिक सुद्धा या रॅकेट मध्ये कार्यरत आहे, पुढे कुणाचं नाव समोर येणार? यावर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे.

झटपट पैसे कमविण्याचे नवे माध्यम म्हणजे ऑनलाइन जुगार, सध्या भारत देशात हे प्रतिबंधित असले तरी छुप्या मार्गाने आजही एप च्या माध्यमातून हे सर्व जुगाराचे खेळ सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने