बसच्या चाकेत आल्याने युवकाचा मृत्यू. #Accident

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- शहरातील अत्यंत रहदारीच्या आसिफाबाद मार्गावर बँक ऑफ इंडिया समोर राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा चाकेत आल्याने एका 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
#Accident #Adharnewsnetwork
या तरुणाच्या जाण्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी राजुरा पोलिसांनी बस चालक निलेश झाडे याला ताब्यात घेतले आहे. बँक ऑफ इंडिया व नगर पालिका कार्यालय परिसरात नेहमी गर्दी असते. प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 2 वाजताच्या दरम्यान येथून दोन महिला रस्ता ओलांडत होत्या. नेमक्या त्याच वेळी राहुल रेकलवार हे एका दुचाकीवर मागे बसुन येत होते. या महिलांना वाचविण्यासाठी गाडी थांबवताना दुचाकी खाली रस्त्यावर पडली आणि रेकलवार सह दुचाकी चालक खाली पडले.
   यावेळी बस क्रमांक MH 13 CV 6338 ही एसटी डेपो कडून बस स्थानकाकडे जात होती. यावेळी लक्ष नसल्याने राहुल रेकलवार यांनी बाजूने उठण्याचा प्रयत्न केला आणि याचवेळी बसचे मागील चाकाखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी बस चालक निलेश राजू झाडे रा. चुनाळा याला ताब्यात घेतले असून घटनेच्या अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.