अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शिवसैनिकास युवासेना जिल्हा प्रमुखाची मदत. #Help(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शिवसैनिकास युवासेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे यांनी सहकार्य करुन आपुलकीचा परिचय दिल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे. #Adharnewsnetwork
प्राप्त माहितीनुसार भटाळी या गावातील सुरेश खिरडकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. ते काही दिवसांपूर्वी आपल्या शेतातील काम आटोपून घरी परत येत असताना भटाळी वेकोलि परिसरातील झाडांमध्ये दबा धरुन बसलेल्या अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार झाल्यानंतर डाक्टरांनी नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. ही बाब युवासेना जिल्हा प्रमुख यांना माहीत होताच त्यांनी येथील नगरसेवक तथा युवा सेनेचे पदाधिकारी पप्पू सारवन यांना नागपूर येथील मेडीकल रुग्णालयात जाऊन मदत करण्यास सांगितले. त्यांनी नागपूर येथील माथाडी कामगार सेना शहर प्रमुख सिद्धू कोमजवार यांना ही माहीती देताच त्यांनी मेडीकल रुग्णालयात जाऊन व डाॅक्टरांना भेटून योग्य उपचार करण्यास सांगितले. त्यामुळे खिरडकर कुटुंबियांनी शिंदे, सारवन आणि कोमजवार या युवा सेना पदाधिका-यांचे आभार मानले आहे.#Help

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत