Top News

एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशीही वर्षातील ३६५ दिवस शिकवणी वर्ग सुरू (365 डे स्कूल). #School

प्रहार जनशक्ती पक्षाचे बिडकर कार्यकर्त्यानी शाळेला भेट देऊन आदर्श शिक्षकांचा केला सन्मान.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या जिवती तालुक्यातील पालडोह या छोट्याशा गावात डिजिटल जिल्हा परिषद शाळा पाहायला मिळणार महत्वाचे म्हणजे ही जिल्हा परिषद शाळा वर्षाला ३६५ दिवस सुरू असते कोणत्याही सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा शिकवणी वर्ग सुरू असतात.#Adharnewsnetwork


त्या शाळेचा संघर्ष पाहता खूप अभिमान वाटतो तिथे मुख्याध्यापक पदी रुजू असलेले शिक्षक श्री.परीतेकी सर यांचा या गावासाठी व शाळेसाठी खूप लाख मोलाचा वाटा आहे परीतेकी सर २००६ मध्ये पालडोह या प्राथमिक शाळेवर रुजू झाले आणि तिथूनच या शाळेची क्रांतीची सुरुवात झाली सर यवतमाळ जिल्ह्यातील कान्ही या गावचे रुजू झाले तेव्हापासून परतेकी सर याच शाळेवर आहे आज जवळपास १५ वर्षे होऊन सुद्धा सरांनी कधीं बदलीचा विषय डोक्यात आणला नाही या पंधरा वर्षाच्या काळात सरांनी शाळेचं सर्व्ह रंगरूप बदलवून टाकलं आज सरांच्या अथक प्रयत्नांनी ९ वी व १० विचे वर्ग मंजूर झाले आहेत परातेकी सरांच्या प्रयत्नाने ही शाळा डिजिटल शाळा म्हणून प्रसिद्धीस आली आज हि शाळा महाराष्ट्रात 17व्या क्रमांकावर आणि आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. याचा खूप अभिमान वाटतो आहे हे परीतेकी सरांच्या विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमामुळे हे सगळं सिध्द झाल आहे जिवती पहाडावर जिथं शिक्षक लोक जाण्यासाठी टाळाटाळ करतात बदली काढतात पण एक परेतिकी सर एक आदर्श शिक्षक म्हणूण सन्मानित आहे.


सरांची पंधरा वर्षे तर पाहता पाहता निघून गेली पण पुढील वर्षे सर इथेच या शाळेसाठी खर्ची करणार विशेष म्हणजे विद्यार्थी सुद्धा विद्यार्थ्यांना परिपाठ पूर्ण पने शिकवतात हे सर्व बघून प्रहार चे कार्यकरते भारावून गेले कारण जील्हा परिषद शाळेला एडमिशन फुल असा बोर्ड दर वर्षी पाहायला मिळतो व काही विद्यार्थि एक, दोन, अशा वर्षा पासून वेटींग वर राहतात .
प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे क्रांती सप्ताह दीन राबवण्यात आला त्यात आदर्श शिक्षकांचा सत्कार करणे त्या निमित्त खरच एक आदर्श शिक्षक पाहायला मिळाले याची माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू साहेब यांना देण्यात आली असून चंद्रपूर दौर्या  दरम्यान शाळेला नक्की भेट देऊ असे आश्वासन देण्यात आले.
   पालडोह गावाला या शाळेला परितेकी हे सर मिळाले खूप अभिमानाची गोष्ट आहे त्या विद्यार्थ्यासाठि देवदूत भेटल्यासारख झालं सरांनी शाळेचं वातावरण खूप छान केलं   विशेष म्हणजे हि शाळा ३६५ डे  शाळा अशी नव्याने ओळख निर्माण करत आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष सतीश बिडकर, पंकज माणूसमारे, तिलक पाटील, जीवन तोगरे, अनुप राखुंडे,यांनी शाळेला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेतली  शाळेला व मुख्याध्यापक परतेकि सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
#School

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने