Top News

नारंडा येथे कोरोना लसीकरण शिबीर संपन्न. #Vaccination


सरपंच सौ.अनुताई ताजने यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.

लसीकरणाकरिता नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत नारंडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा तर्फे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २०० कोविशिल्ड लस नागरिकांना देण्यात आल्या.यावेळी लसीकरण शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.अनुताई वसंतराव ताजने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नारंडा उपसरपंच बाळा पावडे उपस्थित होते. #Vaccination 

कोरोना आपल्यातून हद्दपार करण्यासाठी सर्व यंत्रणा आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत आहेत,पंरतु आपण समाजात एक जागृक नागरिक म्हणून जीवन जगत असताना आपले सुद्धा कर्तव्य समजून प्रत्येक नागरिकांनी कोरोना लसीकरण घेतले पाहिजे.कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी व सॅनिटाइझरचा वापर करत आहोत परंतु कोरोना ला संपूर्ण हद्दपार करण्यासाठी १००% लसीकरण होणे आवश्यक आहे. #Adharnewsnetwork
    नारंडा येथे लसीकरण शिबिराकरिता गावातील पुरुष व महिला वर्गानी उस्फुर्त प्रतिसाद दिला.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा,आशा वर्कर,ग्रामपंचायत नारंडा येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने