दुचाकीची आमने सामने जोरदार धडक. #Accident

Bhairav Diwase

अपघातात 2 जण ठार तर 1 जण जखमी.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी-आरमोरी रोड वरील रनमोचन फाट्या लगत असलेल्या बसस्थानकाजवळ हायवे मार्गावर खराब झालेल्या रस्त्यावर 2 मोटर सायकची आमने सामने धडक झाल्याने मोठा अपघात घडला यात एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा ग्रामिण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे मरण पावला. तर एक जखमी झाला आहे. 

सविस्तर काल रात्रौ 8 चे सुमारास ब्रम्हपुरी- आरमोरी रोड वरील रनमोचन फाट्या जवळ सदर 2 टू व्हीलर MH 34 AY 9562 व MH 34 KR 6382 एकमेकांवर धडकल्याने निर्णय बाबा देवगड रा. गांगलवाडी याचा घटनास्थळी मृत्यू झाला तर दुसरा सुधीर मधुकर सावरकर रा. ब्रम्हपुरी हा ग्रामिण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे उपचारा दरम्यान मरण पावला असून तिसर्‍या व्यक्ती बंडू माधाव उरकुडे रा. ब्रम्हपुरी हा जखमी झाला आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.