🙏


🙏✍️

आजी व नातीनचा चारचाकी वाहनांच्या धडकेत मृत्यू. #Accident


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:- मॉर्निंग वॉक करीता बाहेर गेलेल्या आजी व नातीन यांचा चारचाकी वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला. भिकेश्वर गावाजवळ सकाळी 6 वाजता ही घटना घडली, सकाळी आजी व नातीन नेहमीप्रमाणे नागभीड-ब्रह्मपुरी मार्गावर फिरायला गेल्या होत्या, त्यावेळी नागपूर वरून भाजीपाला घेऊन जाणारे आयशर वाहन क्रमांक एमएच 33 टी 2470 भरधाव वेगात येत दोघांना उडविले. #Accident 

या धडकेत 60 वर्षीय आजी सुगंधा विश्वनाथ अनवले यांचा जागीच मृत्यू झाला तर नातीन 6 वर्षीय हार्दिक अमन मिसार चा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. धडकेनंतर सदर आयशर वाहन हे रस्त्यावर पलटी झाले. #Adharnewsnetwork
वाहन चालकांवर कलम 304,279, भा द वी मोटार वाहन कायदा अंतर्गत 184,134,177 गुन्हा दाखल करण्यात आला. वाहन चालक फरार आहे. सदर घटनेने भिकेस्वार व सुलेझरी गावावर शोककळा पसरली असून पोलिस तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत