💻

💻

१० वर्षांनंतर लष्करी अळीचे पुनरागमन; शेतकरी वर्गात चिंता वाढली. #Bhadrawati

किटकनाशकांची फवारणी करण्याचे आवाहन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- सुमारे १० वर्षापूर्वी सोयाबिनचे उभे पिक उद्धवस्त करुन हाहाकार माजविणा-या लष्करी अळीचे भद्रावती तालुक्यात आगमन झाले असून शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अळी, किटक आणि पिकावरील रोग ही शेती व्यवसायासाठी नित्याचीच बाब आहे. परंतू सुमारे १० वर्षापूर्वी भद्रावती आणि वरोरा तालुक्यात लष्करी अळीचे जत्थेच्या जत्थे आले होते.या जत्थ्यांनी शेतक-यांचे सोयाबिनचे उभे पिक उद्धवस्त करुन टाकले होते.हीच अळी भद्रावती तालुक्यात सोयाबिन पिकाकावर नुकतीच आढळून आली असून सोयाबिनच्या झाडांची पाने पूर्णपणे कुरतडली जात आहेत. ही बाब किसान पुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे यांच्या लक्षात येताच त्यांनी भद्रावती तालुक्यातील काही गावांचा सर्व्हे केला. त्यात तालुक्यातील वाघेडा, जेना, पिर्ली, धानोली, धामणी, नंदोरी व टाकळी या गावातील सोयाबिनच्या पिकांवर लष्करी अळी आढळून आली. ही अळी इतकी भयानक असते की, एका रात्रीतून पूर्णच्या पूर्ण क्षेत्र नष्ट करते. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे.
दरम्यान, आजपर्यंत सोयाबिन पिकावरील लष्करी अळीसंदर्भात शासनातर्फे कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचा आरोप नरेंद्र जीवतोडे यांनी केला असून पिक नष्ट होण्यामुळे शेतक-यावर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता व्यक केली आहे.तसेच सर्व शेतकरी बांधवांनी तात्काळ अळीवर्गीय किटकनाशकांची फवारणी करुन घ्यावी असे आवाहनही नरेंद्र जीवतोडे यांनी शेतक-यांना केले आहे.#Bhadrawati

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत