शोभाताई फडणवीस यांना पुत्रशोक. #Death

Bhairav Diwase
अभिजित फडणवीस यांचे निधन.
चंद्रपूर:- राज्याचे माजी मंत्री भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचे पुत्र अभिजीत माधवराव फडणवीस (५४) यांचे आज (२५/८/२१) रोजी सकाळी ९.३० वा. हृदय विकाराच्या झटक्याने नागपुर येथे दुःखद निधन झाले. #Death
त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज अभिजीत यांना नागपूर येथे हृदयाचा तीव्र झटका आला त्यात त्यांचे निधन झाले. नागपूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीयांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. #Adharnewsnetwork
‌अभिजीत हे माजी मंञी, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या तथा लोकनेत्या शोभाताई फडणवीस यांचे एकुलते एक सुपुञ, विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंञी आदरणिय देवेंद्रभाऊ फडणवीस यांचे चुलत बंधु होते.
त्यांचेवर आज नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. स्व. अभिजीतभाऊ फडणवीस यांना भावपुर्ण श्रध्दांजली. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. ही प्रार्थना.