🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

अभ्यासिकेला मदतीचा हात देत सुरज माडुरवार शिवसेना तालुका प्रमुखांचा वाढदिवस साजरा. #Birthday


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- वाढदिवस म्हणजे हल्ली दोस्त,मित्र आणि परिवारातील सदस्यांसोबत 'एंजॉय' करण्याचा दिवस समजला जातो.असे असताना मात्र गोंडपीपरी तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्याचा उपक्रम अनेकांना प्रेरणा देऊन गेला.सध्या या वाढदिवसाची चांगलीच चर्चा तालुक्यात आहे.
तालुक्यातील मूळचे वढोली येथील सुरज माडुरवार शिवसेना तालुका प्रमुख आहेत. नेहमीच्या भन्नाट कल्पना आगळ्या वेगळ्या उपक्रमाने ते सदासर्वदा सुपरिचित असतात. नेहमी समाजापयोगी उपक्रम राबवणारी ही व्यक्ती स्वतःच्या जन्मदिनी करते तरी काय याकडे अनेकांचे लक्ष लागले. २३ आगस्ट दिवस उजळताच युवा सामाजिक नेतृत्वाने सहकाऱ्यांना सोबत घेत सबंध दिवस सेवेत घालवला.
       
        यावेळी वाढदिवसानिमित्य माडुरवारांनी लिखितवाडा येथील अभ्यासिकेला मदतीचा हात देत पुस्तक ठेवण्याकरिता आलमारी भेट दिली.सोबतच वढोलीतील अभ्यासिकेला खुर्च्या भेट दिल्या. गावातील गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना स्यानेटाईजर वाटप करण्यात आले.एकंदरीत सुरज माडुरवारांनी वाढदिवसानिमित्य राबवलेल्या उप्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून हे उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
        यावेळी शिवसेना जिल्ह्या उपप्रमुख माजी जि. प उपाध्यक्ष संदिप करपे, ग्रा.पं सदस्य कोमल फरकडे, पत्रकार संदिप रायपुरे, समीर निंमगडे, प्रसेनजीत डोंगरे, शिवसेना तालुका शहर प्रमुख शैलेश भैस, सुनील फरकडे, बब्बू पठाण, आनंदराव गोहणे,रमेश नायडू,नरेंद्र इंगोले,किशोर अगस्ती,संजय माडुरवार,पांडुरंग कोहपरे, विलास चौधरी,ग्रा.पं सदस्य संदिप पौरकार,रायुकॉचे जयेश कार्पेनवार,निखिल नामेवार,प्रीतम कोहपरे,गोकुल सोंनटके,वैभव निंमगडे,शुभम भोयर,तुकाराम सातपुते,अमित भोयर,संदिप लाटकर,सुधीर अवथरे,उमेश उपासे,सुधीर धनदरे,मोहन ढुमने,जितेंद्र चुदरी यांच्यासह माडुरवार यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनी उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत