Top News

नगरसेवक सुभाष कासनगुट्टूवार यांच्या सहकार्याने 111 मोतीया बिंदू ऑपरेशनकर्ते सेवाग्राम ला रवाना. #Chandrapur



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:-मोतीया बिंदू ऑपरेशन करीता नागरिकांना सेवाग्राम येथे रवाना करण्यात आले. नगरसेवक- सुभाष कासनगुट्टूवार यांचे निवस्थान तुकुम, चंद्रपूर येथून सेवाग्राम मेडिकल कॉलेज येथे पाठवण्यात आले. तेव्हा कासनगुट्टूवार यांनी ऑपरेशन करीता जाणाऱ्या नाग्रीकांना सांगितले की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेन्द्रजी मोदी यांनी कुणाचीही दृष्टी पैशाअभावी जाऊ नये. करीता केन्द्र सरकार च्या माध्यमातुन ही चांगली योजना करण्यात आली आहे. विकास पुरुष लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त मी प्रभागमध्ये जवळपास अकराशे नागरिकांचे डोळेतपासणी व चष्मे वाटप कार्यक्रमा चे आयोजन केले. हे सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेची सेवा करण्यात आपला वेळ खर्ची घातला त्यांचा वसा घेऊन मी हे सेवाकार्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. #Adharnewsnetwork
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा फायदा घेतला. त्या पैकी 111 नागरिकांचे मोतीयाबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे. तेव्हा आज ऑपरेशन करणाऱ्या करिता पाठवण्यात येत आहे. मी माता महाकाली ला प्रार्थना करतो की आपण सर्वांची दृष्टी परतयावी. असे बोलताच सर्व ऑपरेशन कर्त्यांनी वार्ड का नगरसेवक कैसा हो सुभाषभाऊ जैसा हो तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विजय चा जयघोष केला. #Chandrapur
   तेव्हा सर्वांना सॅनिटायझर, मास्क, बिस्किट देऊन रवाना करण्यात आले. तेव्हा भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सौ. मंजुश्री कासनगुट्टूवार, अनुसूचित जमाती मोर्च्या महानगर जिल्हाध्यक्ष धनराज कोवे,अल्पसंख्याक मोर्च्या महानगर जिल्हाध्यक्ष अमिनभाई शेख, मंडळ उपाध्यक्ष पुरुषोत्तम सहारे, युवा मोर्च्या महानगर सचिव आशिष ताजने इत्यादी ची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने