राज इंग्लिश मीडियम शाळेजवळ अवैधरित्या दारू विक्री; पोलीस गप्प का?#Illegalwork

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर, कोरपना
कोरपना:- कोरपना नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक दोन मधील ओपन स्पेस वर अनधिकृत अतिक्रमण करून अवैध दारूचा व्यवसाय जोरात सुरु असताना पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने वार्डातील महिला व नागरिकांना बेवड्यांचा कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे तसेच अग्निशमन भवनासाठी निश्चित केलेल्या जागेवर अनधिकृत घराचे बांधकाम झाले असताना नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष का? कोरपना येथे देशी दारूचे अधिकृत परवाना दुकान नसताना कोरपणा येथे ठिक-ठिकाणी अवैध विक्री केंद्र सुरू आहे. मात्र पोलिसांनी अवैध व्यवसायिकांना मोकाट सोडले की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. तातडीने व्यवसायाचे अड्डे बंद करावे अन्यथा महिला आंदोलन छेडण्याचा इशारा युवा स्वाभिमान पार्टीचे कोरपना तालुका अध्यक्ष मोहब्बत खान यांनी दिला.#Illegalwork