महिलांनी समाजातील सर्व घटकासाठी काम करून पक्षाला मजबूत करावे:- आ. सुधीर मुनगंटीवार. #Chandrapur #BJPMA


चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी महिला आघाडीची संघटनात्मक आढावा बैठक श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपूर येथे पार पडली. यावेळी लोकलेखा समिती अध्यक्ष तथा माजी अर्थ मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार , जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, वनिता ताई कानडे प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी, अल्का आत्राम अध्यक्ष महिला आघाडी चंद्रपूर, अंजली घोटेकर अध्यक्ष महिला आघाडी चंद्रपूर शहर, रोशनी खान महिला व बालकल्याण सभापती, रत्नमाला भोयर नगराध्यक्ष मूल, कल्पना बोरकर माजी उपाध्यक्ष जी प, अर्चना जिवतोडे माजी कृषी सभापती, विजयालक्ष्मी डोहे महामंत्री, शिला चव्हाण महामंत्री, भारती दुधानी तसेच सर्व जिल्यातील भाजपा महिला कार्यकर्ता उपस्थित होते. #Chandrapur #BJPMA

यावेळी पक्षाच्या बूथ रचणेत महिलांचा सहभाग ते जिल्यातील रचनेत महिलांचा सहभाग तसेच पुढील काळात महिला आघाडीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्याची योजना आणि संघटना मजबूत करण्यासाठी योग्य नियोजन तसेच मा शोभाताई फडणवीस यांचे चिरंजीव अभिजित फडणवीस यांचे दुःखद निधन झाले त्या प्रितर्थ्य महिला आघाडीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. #Adharnewsnetwork

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या