Top News

ज्वलंत विद्युत तारेच्या स्पर्शाने एकाचा मृत्यू. #Death

महावितरणकडे नुकसानभरपाईची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे ज्वलंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन एका गरीब शेतकरी वर्गातील युवकाचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये महावितरण कंपनी जबाबदार असल्याचे नातेवाइकांचे आक्षेप असून नातेवाइकांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. #Death
शनिवारी दुपारी गौरव माधव हरने आपल्या शेतीतील कामासाठी झाडाची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढला असतात त्या झाडाच्या आत मधून ज्वलंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर तिथे बसलेले पक्षीसुद्धा मरण पावले. या प्रकरणांमध्ये गावकरी व आप्तमंडळीनी महावितरण कंपनी जबाबदार धरले असून. जोपर्यंत कंपनी नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करण्यास नातेवाईकांनी मनाई केली आहे. महावितरण कंपनीतर्फे अभियंता लोहे यांनी तोंडी आश्वासन देत काही रक्कम जाहीर केली होती. परंतु नातेवाईकांना ते मान्य नव्हते. #Adharnewsnetwork
24 तास उलटून सुद्धा कंपनीने काहीच मदत न केल्याने मृतदेह उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे ठेवण्यात आलेला आहे. भटाळा येथील सरपंच सुधाकर रोहणकर यांनी मोबदला दिल्याशिवाय शवविच्छेदन करून देणार नाही अशी भूमिका घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली.

घटनास्थळी वरोरा ठाणेदार खोबरागडे सह भद्रावतीचे महावितरणचे उपअभियंते एस.ऐ.लोहे व गावकरी यांच्यामध्ये चर्चा सुरू होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने