जाहिरात... Advertisement... विज्ञापन

अडेगाव येथील युवक आक्रमक. #Youth #Aggressive


उद्या पासुन‌ करणार‌ खड्यात उपोषण:-मंगेश पाचभाई
यवतमाळ:- यवतमाळ जिल्ह्यातील टोकावरील झरी-जामनी तालुक्यातील गौनखनिजाने व्यापलेले अडेगाव- खडकी-गणेशपुर या परिसरात मोठ्या खदानी आहे. या खदानींचें मोठी वाहतूक ही खडकी मार्गे अडेगाव या रस्त्याणी चालत असतात या परिसरात जगती मिनरल्स, ईशान मिनरल्स, सूर्या मिनरल्स, गुंडावार मिनरल्स, मोनेट इसपात व इतर गिट्टी खदानी चे मोठी वाहतूक ही अडेगाव रस्त्याणी जाते या रस्त्याची मर्यादा फक्त दहा टनची असताना या रस्त्यावरून खदानी चे मोठी जड वाहतूक होते यामुळे अडेगाव -खडकी रस्ता संपूर्ण खराब झाला असून प्रशासनाला वारंवार पत्र व्यव्यार करून सुद्धा प्रशासन या मागणी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून या परिसरातील जड वाहतूकीमुळे संपूर्ण कंपनीने रस्ता खराब झाला आहे तरी अनेकदा मागण्या करून सुद्धा रस्ता न झाल्याने अडेगाव येथील युवा नेतृव मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वाखाली दि 30/8/2021 पासून खडकी बस स्थानकाच्या बाजूला अनोखे खड्यात उपोषण करण्यात येणार आहे. #Youth #Aggressive


या उपोषण अनोखे असल्याचे मंगेश पाचभाई यांनी बोलून दाखवले. या उपोषणात दुसऱ्या दिवशी जिल्हा अधिकारी याना रक्ताने पत्र, तिसऱ्या दिवशी मुंडन , चौथ्या दिवशी रास्ता रोको असे अनेक मुद्दे आहे. यामुळे हे उपोषण आक्रमक होणार असल्याची चर्चा परिसरात आहे. #Adharnewsnetwork
प्रशासन या कडे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या उपोषणात अडेगाव येथील राहुल ठाकूर, दत्ता लालसरे, गिरीधर राऊत, दिनेश जीवतोडे, निखिल देठे, दत्ता भोयर व इतर उपोषण करते असतील. अशी माहिती मंगेश पाचभाई यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत