(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या मुलभुत समस्या मार्गी लावण्याचे काम केल्यास पालकमंञी विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्वात जिल्ह्यात काँग्रेस सशक्त झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास व्यक्त करतांना संदीप गड्डमवार यांनी कर्मभूमीतल्या कार्यकर्त्यांनी सत्कार करून अधिक जबाबदारी सोपविल्याचे मत व्यक्त केले.
पक्षाच्या प्रदेश सचिव पदाची जबाबदारी सोपविल्या बद्दल पक्षश्रेष्ठीचे आभार माणतांना जिल्ह्याचे पालकमंञी आणि काँग्रेस लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वात काँग्रेसच्या प्रगती आणि मजबुती करीता प्रयत्न करण्याची ग्वाही संदीप गड्डमवार यांनी दिली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सचिव आणि जिल्हा नियोजन विकास समितीच्या नामनिर्देशित सदस्य पदी निवड झाल्या बद्दल सावली तालुका व शहर आणि युवक काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने संदीप गड्डमवार यांचा सत्कार करण्यात आला.
त्यावेळेस ते बोलत होते. पालकमंञी विजय वडेट्टीवार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सावली शहराध्यक्ष विजय मुत्यलवार होते. यावेळी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन गोहणे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष राकेश गड्डमवार, भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे सचिव राजाबाळ संगीडवार, शेतकरी सहकारी संस्थेचे अध्यक्ष मोहन गाडेवार, नगर पंचायतचे माजी उपाध्यक्ष भोगेश्वर मोहुर्ले, माजी गटनेते गुणवंत सुरमवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पंचायत समितीचे माजी सभापती तथा कार्यालय प्रमुख मोतीलाल दुधे यांनी प्रास्ताविक करतांना गड्डमवार परीवाराच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी तालुक्यातील पांदण रस्त्याचे खडीकरण व्हावे अशी तर तालुकाध्यक्ष नितीन गोहणे यांनी क्षेञाचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार राज्याचे मंञी असल्याने त्यांना सावली तालुक्याकडे लक्ष देण्यास अलीकडे वेळ मिळत नसल्याने त्यांची उणीव संदीपभाऊनी भरून काढावी अशी अपेक्षित व्यक्त केली.
ज्येष्ठ कार्यकर्ते राजाबाळ संगीडवार यांनी जिल्ह्यातील काँग्रेस मजबुत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून पालकमंञ्याचे हात बळकट करावे. असे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना शहराध्यक्ष विजय मुत्यलवार यांनी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते विजयभाऊ सोबतच संदीपभाऊ यांच्या पाठीशी सदैव उभे राहतील. असा विश्वास दर्शविला.
समारंभा दरम्यान काँग्रेसच्या स्थानिक पदाधिका-यांच्या वतीने विजय मुत्यलवार यांचे हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मालार्पणाने सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे संचलन चंद्रकांत संतोषवार आणि आभार युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन दुवावार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत राईंचवार, संदीप पुण्यपवार, प्रफुल वाळके, अनुज म्याँडावार, पंकज सुरमवार, छञपती गेडाम, निखील दुधे, अंतबोध बोरकर, राजु व्यास, मनोज धर्मपवार, नितीन गड्डमवार, मृणाल गोलकोंडावार, प्रितम गेडाम, रविंद्र मुप्पावार, विवेक सुरमवार आदींनी परीश्रम घेतले.