अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या इसमाचा नदीत बुडून मृत्यू. #Deathपोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी वैनगंगेच्या प्रवाहावर गेलेल्या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक ९ ऑगस्ट रोजी देवळा बुद्रुक येथे घडली.#Adharnewsnetwork
देवळा बुद्रुक येथील माजी सरपंच निलकंठ भिवांकर यांचा आजारामुळे मृत्यू झाला जुनगाव आणि देवाड्याच्या मध्यंतरी असलेल्या वैनगंगा नदीच्या प्रवाहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळीच्या निमित्ताने सदर व्यक्ती खोल पाण्यात गेला व त्यात त्याचा बुडून मृत्यू झाला. मृत पावलेल्या दुर्देवी इसमाचे नाव रामदास भिवनकर वय अंदाजे 48 असे असून त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
 घटनेची माहिती मुल पोलीस स्टेशनला होताच पोलीस अधिकारी प्रशांत ठवरे आणि राठोड हे त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळावर भेट देऊन मृतदेहाची शोधमोहीम सुरु केली आहे. ही घटना दुपारी बारा वाजता चे दरम्यान घडली असून वृत्त लिहीपर्यंत मृतदेह हाती लागला नव्हता.#Death

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत