जाहिरात... Advertisement... विज्ञापन

शहरातील गांधी चौक बनला आंदोलनाचा आखाडा. #Movement(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार हे महानगरपालिकेच्या घोटाळ्याविरोधात आज रणशिंग फुंकण्यात आले होते. कोरोना काळातील पालिकेचा कारभार, 200 कोटी लेखा परीक्षणात घोटाळा, कोरोना काळात सुद्धा नवी कार, वाहनाला VIP क्रमांक, अमृत योजना अश्याया विविध विषयांवर आमदार जोरगेवार आंदोलन करणार आहे.
आमदारांच्या या आंदोलनाला भाजपा उत्तर देण्यासाठी पुढे आली होती, नागरिकांना 200 युनिटच्या भूलथापा यावर आमदार जोरगेवार यांच्या विरोधात भाजपचे आज घंटानाद आंदोलन करण्यात येणार होते. #adharnewsnetwork
     चंद्रपूर येथे मनपा समोर गांधी चौकात आमदार किशोर जोरगेवार ह्यांनी मनपा महापौर ह्यांच्या वाहन खरेदीला आव्हान देत दे धक्का आंदोलन घोषित केले होते तर त्याच्या विरोधात भाजपा महानगर तर्फे किशोर जोरगेवार ह्यांच्या विरोधात रेती माफियांवर कारवाई करण्यासाठी आजच आंदोलन छेडण्यात आले होते.
        आज शहरातील गांधी चौक आंदोलनाचा आखाडा बनला होता. अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या विरोधात भाजपची जोरदार निदर्शने केली तर अपक्ष आमदारांच्या कार्यकर्त्यांनी आज सत्ताधारी भाजप मनपा विरुद्ध पुकारले होते दे धक्का आंदोलन केले. दोन्ही आंदोलकांनी अवैध भाषण मंडप उभारले होते, ते पोलिसांनी कोरोना नियमावलीचा आधार घेत मंडप काढून टाकण्याची कृती केली.
भाजपने आपले आंदोलन पोलीस बळाचा वापर करून दडपली जात असल्याचा आरोप केला, अपक्ष आमदारांनी चंद्रपूरकरांना 200 युनिट वीज मोफत देण्याच्या आश्वासनाचा विरोधात भाजपचे आंदोलन होते. पोलिसांनी महापौर व इतर भाजप नेत्यांसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

         
भाजप सत्तेत असलेल्या चंद्रपूर महापालिके विरोधात स्थानिक अपक्ष आमदार आक्रमक भूमिका घेतली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या यंग चांदा ब्रिगेड संघटनेने भ्रष्टाचाराविरोधात "दे धक्का आंदोलन" केले. गेल्या काही वर्षात चंद्रपूर महापालिकेत झालेल्या चार मोठ्या घोटाळ्याबाबत आंदोलन केले. कोरोना काळातील गरजांपेक्षा महापौरांनी स्वतःच्या वाहनासाठी 70 हजार रुपये खर्च करत विशेष क्रमांक मिळविल्याचा विरोध, भाजपने गेल्या पाच वर्षात चंद्रपूरकर यांची लूट केल्याचा केला आरोप, चंद्रपूरची जनता भाजपला माफ करणार नसल्याचे आमदार जोरगेवार यांचे विधान केले.#Movement

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत