घरकाम करणाऱ्या महिला या कुटुंबाचाच एक भाग- अविनाश जाधव #Program

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा चा अभिनव उपक्रम.

23 घरकाम करणाऱ्या महिलांचा केला सत्कार.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे घर काम करणाऱ्या महिलांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून घरकाम करणाऱ्या महिला या कुटुंबाचा एक भाग आहे. असे प्रतिपादन अविनाश जाधव माजी जिप सदस्य तथा सचिव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ यांनी यावेळी केले.#Adharnewsnetwork


स्थानिक किसान भवन येथे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अविनाश जाधव, माजी जिप सदस्य तथा सचिव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभावती नागापुरे, सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका भद्रावती, विलास कुंदोजवार,वनपाल, सामाजिक वनिकरण, तथा तालुका संघटक नेफडो,अल्का सदावर्ते, तालुका महिला अध्यक्ष, दिलीप सदावर्ते,रजनी शर्मा,तालुका उपाध्यक्ष, किरण घाटे आदींची उपस्थिती होती. राजुरा शहरातील तेवीस घरकाम करणाऱ्या महिलांना ब्लेंकेट, श्रीफळ व फळे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्तावीकेतून अल्का सदावर्ते यांनी नेफडो संस्थेमार्फत राबाविण्यात आलेल्या उपक्रमाची सविस्तरपणे माहिती विषद केली. 


पर्यावरण संवर्धन व मानवता विकास करणे हा आम्हचा उद्देश असून त्याकरिता सर्वांचे सहकार्य लाभत असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन एड.मेघा धोटे, तालुका सचिव यांनी केले. आभार बादल बेले, नागपूर विभाग सचिव यांनी मानले. 

या उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा संघटक विजय जांभुळकर, तालुका अध्यक्ष संतोष देरकर, राजश्री उपगन्लावार, मनोज तेलीवार, वर्षा कोयचाडे, नितीन जयपूरकर, सूनेना तांबेकर, प्रतिभा भावे, विना देशकर, माणिक उपलंचिवार, वज्रमाला बतकमवार, कृतिका सोनटक्के, वर्षा वैद्य, आशिष करमरकर, बबलू चव्हाण, संदीप पोगला, संदीप आदे, सुजित पोलेवार, मोहनदास मेश्राम, प्रदीप भावे, रत्नय्या नक्कावार, किरण हेडाऊ, सुनीता उगदे, पूर्वा देशमुख आदींसह नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुराच्या सभासदानी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली. #Program

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत