वाघाच्या हल्ल्यात गाय ठार, ६० हजाराचे नुकसान. #Tigerattack

Bhairav Diwase
चार दिवसात दुसरी घटना.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील मांगली(रै.)शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना दि.८आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.#Adharnewsnetwork
प्राप्त माहितीनुसार, भद्रावती तालुक्यातील मांगली (रै.) येथील गुराखी मधुकर कोटनाके याला दि.३आॅगस्ट रोजी वाघाने ठार केल्याच्या घटनेची शाही वाळत नाही,तोच पुन्हा मांगली येथील शेतक-याची गाय दि.७ आॅगस्ट रोजी वाघाने ठार केल्याची घटना घडली. या घटनेने मांगली येथील ग्रामस्थ भयभित झाले आहेत.

दि.७ आॅगस्टच्या रात्री मांगली येथील शेतकरी सुधाकर उगे यांची दुधाळू गाय गावाजवळच्या शेतशिवारात चरायला गेली असता वाघाने तिच्यावर हल्ला करुन तिला ठार केले. रात्र होऊनही गाय परत न आल्याने दुस-या दिवशी गायीचा शोध घेतला असता ती भोस्कर यांच्या शेताजवळ मृतावस्थेत आढळून आली. गायीच्या शेजारीच वाघाचे पगमार्क आढळून आले. उगे यांची गाय ठार झाल्याने त्यांचे ६० हजाराचे नुकसान झाले आहे. वनविभागाने त्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
#Tigerattack