Click Here...👇👇👇

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने रानभाजी महोत्सव सप्ताहाची सुरुवात. #TribalDay

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून दि.९ ऑगस्ट रोजी येथील पंचायत समितीच्या सभागृहात रानभाजी महोत्सव सप्ताहाचे उद्घाटन जि. प. सदस्या अर्चना जीवतोडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.#Adharnewsnetwork

१५ ऑगस्ट रोजी सांगता होणा-या या रानभाजी महोत्सव सप्ताहाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पं. स. सभापती प्रवीण ठेंगणे मंचावर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव उपस्थित होते. तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी कृषी विभागाने आयोजित केलेल्या रानभाजी महोत्सव सप्ताहामध्ये सहभाग घेऊन रानमेव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जि.प.सदस्या सौ. अर्चनाताई जिवतोडे यांनी यावेळी केले. या रानभाजी महोत्सव सप्ताह निमित्ताने तालुक्यात बाजारस्थळी रानभाजी विक्री स्टॉल लावण्यात यावा जेणेकरून नागरिकांना विषमुक्त भाजीपाला उपलब्ध होईल व या रान भाजीची ओळख होईल असे पंचायत समिती सभापती प्रविनभाऊ ठेंगणे यांनी सुचविले. महोत्सवामध्ये उपस्थित शेतकरी व नागरिकांना रानभाजीचे औषधी गुणधर्म,महत्त्व व पाककृती बाबत मार्गदर्शन कृषी पर्यवेक्षक एम. एस. वरभे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन तंत्र व्यवसाय सहायक सुधीर हिवसे यांनी केले.
महोत्सवामध्ये शेतकरी मित्र, बचत गटाच्या महिला यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व रानभाजी विक्री करण्यात आली. रानभाजी महोत्सव सप्ताहात आघाडा, केना, काटवल, मटारु, कपालफोडी, धानभाजी, फासची भाजी, भूईआवळा, कडू भाजी, कडू तोंडली, घोळची भाजी, गुळवेल, कोचई, चिवरची भाजी, वाघाट्या, फेटर आदी रानभाजांचा समावेश आहे.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.#TribalDay