Top News

वृक्ष लागवड काळाची गरज- विदेश गलगट, वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरा #Environment



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आज सोमवार दिंनाक 9/8/2021 रोज सकाळी 11 वाजता अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उपरवाही, वनविभाग राजुरा, महिला ग्रामसंघ, ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अहेरी येथे वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला.#Adharnewsnetwork

कार्यक्रमाचे उद्घघाटक मा. विदेश गलगट वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरा, अध्यक्ष मा. विशाल भोगावार पी. यु. मेनेजर ACF, BCI, कालिदास दुर्गे शाखा व्यवस्थापक अक्सीस बँक राजुरा, पिंगे मुख्याध्यापक, तिमांडे ग्रामसेवक, ग्राम संघाच्या महिला, गावातील शेतकरी सुधाकर शेरकी, मारोती डोहे, नवनाथ बोबडे व गावकरी उपस्थित होते. प्रक्षेत्र अधिकारी गोपाल जंबुलवार, रुपेश गेडेकर, हेमराज साळवे, अश्विनी जेनेकर, रजनी खानोरकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन आनंद बोरुले व आभार प्रदिप बोबडे यांनी केले. #Environment

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने