💻

💻

भद्रावती पंचायत समिती जिल्ह्यात अव्वल. #Hospitality

स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते सभापती व बीडीओचा सत्कार.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- केंद्र व राज्य पुरस्कृत महा आवास अभियान ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यात भद्रावती पंचायत समिती जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली असून स्वातंत्र्य दिनी चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय महा आवास योजना (ग्रामीण)पुरस्कार वितरण सोहळ्यात पंचायत समितीचे सभापती व गट विकास अधिकारी यांचा दोन अभियंत्यासह नुकताच सत्कार करण्यात आला.#Adharnewsnetwork
दि.२० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण जिल्हाभर महा आवास अभियान (ग्रामीण) राबविण्यात आले. या अभियानात प्रधानमंत्री आवास योजना(ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून प्रथम क्रमांक पटकविण्याचा मान भद्रावती पंचायत समितीला मिळाला. तसेच राज्य पुरस्कृत आवास योजना(रमाई आवास योजना व शबरी आवास योजना) अंतर्गत जिल्ह्यातील सर्वोकृष्ट तालुका म्हणून प्रथम क्रमांकाचे स्थान भद्रावती पंचायत समितीनेच मिळविले. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट क्लस्टरमध्ये चंदनखेडा-मुधोली या प्रभागाने तृतीय क्रमांक मिळविला. हा प्रभागसुद्धा भद्रावती पंचायत समिती अंतर्गत येतो. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये याच पंचायत समिती अंतर्गत मोहबाळा या ग्राम पंचायतीने द्वितीय क्रमांक पटकाविला. अशा प्रकारे चार जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त करुन भद्रावती पंचायत समितीने तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या घवघवित यशाबद्दल ७५ व्या स्वातंत्र्य दिनी चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात भद्रावती पंचायत समितीचे सभापती प्रवीण ठेंगणे, गट विकास अधिकारी डाॅ.मंगेश आरेवार आणि ग्रामीण गृहनिर्माण अभियंते राकेश तुरारे व मिलिंद नागदेवते यांचा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खा.बाळूभाऊ धानोरकर, आ.किशोर जोरगेवार, जि.प.अध्यक्षा संध्याताई गुरनुले, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यपालन अधिकारी मिताली सेठी आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करुन सन्मान करण्यात आला.
#Hospitality

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत