Top News

जिवती तालुक्यातील वणी गावात घडलेल्या घटनेची त्वरित दखल घेऊन अनिस टीम आणि पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. #meeting



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- अतिशय तणावाच्या वातावरणात आणि कडक पोलीस बंदोबस्तात प्रबोधन सभा घेण्यात आली. सभेत जादूटोणा ,करणी ,भूत, भानामती आदी विषयांवर चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.#Adharnewsnetwork


गावात जादूटोणाविरोधी कायद्याची पत्रके वाटली तसेच चित्र प्रदर्शनी लावण्यात आली. देवी अंगात आणून ज्यांनी नावे घेतली त्या चारही स्त्रिया एकापाठोपाठ एक सभा संपल्याबरोबर अंगात देवी आली म्हणून रडू लागल्या, किंचाळू लागल्या ,जमिनीवर लोळू लागल्या .चौकशीमध्ये त्या स्त्रिया अमावस्या-पौर्णिमेला देवी अंगात आणून गावातील शांतता भंग करतात अशी माहिती मिळाली .त्या महिलांना मानसिक रोग तज्ञाकडे कडे उपचारासाठी नेण्याचे निर्देश दिले व पोलिसांनी त्यांना उपचारासाठी भरती केले असून उपचार सुरू आहेत जखमींवर सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला व न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले .पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे. तेलंगाना सीमेवर असलेल्या वणी गावाला सध्या पोलीस बंदोबस्त असून परिस्थिती शांत व नियंत्रणात आहे.#meeting

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने