आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने वृक्ष रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न. #Program(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या वतीने स्थानिक वनोद्यान येथे वृक्ष रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे यांची उपस्थिती होती.#Adharnewsnetwork


प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जंगम, वनविभाग राजुरा चे वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार जांभुळकर आदींची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः टाकाऊ वस्तूपासून राख्या तयार करून वृक्षांना बांधल्या. उत्कृष्ट राखी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले. प्रथम क्रमांक श्रुती रायपुरे, द्वितीय क्रमांक सरिता लोहबडे, तृतीय क्रमांक अनुष्का काशेट्टीवर, प्रोत्साहनपर बक्षीस कस्तुरी बेले यांना देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा वाढई यांनी केले. प्रास्ताविक राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांनी तर आभार प्रदर्शन प्रतिभा मोरे यांनी केले.


 यावेळी नेफडो चे शहराध्यक्ष संदीप आदे, तालुका संघटक वर्षा कोयचाडे, कृतिका सोनटक्के, रजनी शर्मा, ललिता खंडाळे, वज्रमाला बतकमवार, माणिक उपलंचिवार, सहाय्यक शिक्षक संतोष वडस्कर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.#program

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या