कोरोना योद्धा सोबत राखी बांधून केला रक्षाबंधन उत्सव साजरा. #Rakshabandhan

भाजपा महिला आघाडी राजुराचा पुढाकार.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- संपुर्ण देशात कोरोना या महामारी देशाला हादरून सोडले तरी पण आपल्या जीवाची पर्वा न बाळगता दिवस रात्र जनतेच्या सेवेत आपले कार्य निरंतर सुरू ठेवून सेवा देण्याचे कार्य करत राहणारे आरोग्य विभाग,पोलीस विभाग सफाई कर्मचारी,तसेच अनेक संघटनाचे पदाधिकारी या कोरोना योद्धाने आपले कार्य तन मनाने अविरत सेवा दिली त्याबद्दल भाजपा महिला आघाडी राजुरा तर्फे रक्षाबंधन सणाचे अवचित साधून आरोग्य विभाग तसेच पोलीस बांधव यांना राखी बांधून रक्षाबंधन हा सण मोठया उत्सहात साजरा केला, माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.#Adharnewsnetwork


कार्यक्रमा प्रसंगी भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सौ स्वाती देशपांडे, भाजपा जिल्हा कार्यकरणी सदस्य सौ माणिक उपलंचिवार, नगरसेविका श्रीमती उज्वला जयपूरकर, नगरसेविका सौ प्रिती रेकलवार, भाजपा महिला आघाडी शहर सचिव ममता केशेट्टीवार, भाजपा नेत्या सौ शांताबाई कदम, श्रेया रामगिरवार, प्रिया रानिंगा, सिद्धी आक्केवार, भूमिका मंगरूळकर, तसेच ईतर पदाधिकारी उपस्थित होते.#Rakshabandhan

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत