(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- जिल्ह्यातिल धान उत्पादक शेतकर्यांच्या थकित धानाचे चुकारे शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा व्हावे यासाठी आ.कृष्णा गजबे यांनी देसाईगंज येथे दि १६ ऑगस्ट ला चक्काजाम आंदोलन करुन ३० तारखेच्या आत चुकारे जमा न केल्यास संपुर्ण जिल्हाभर आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता. या गंभिर समस्सेची दखल घेत आज राज्य शासनाने धान उत्पादक शेतकर्यांचे थकित चुकारे बँक खात्यात जमा करण्याचा आदेश देवुन धान खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या माध्यमातुन खरेदी करण्यात आलेल्या शेतकर्यांचे ४१८ कोटी रुपये व आदिवासी विकास मंडळाच्या मार्फतिने खरेदी केलेल्या धानाची ८२ कोटी रुपयांची वळती सदर संस्थांना केल्याने आता लगेच शेतकर्यांना थकित रक्कम मिळणार असल्याने शेतकर्यांना चालु हंगामाकरिता मोठी मदत होणार आहे. #Gadchiroli #Chandrapur #MLAKrishnaGajbe
आ.कृष्णा गजबे यांनी उभारलेल्या चक्काजाम आंदोलनाचे हे मोठे यश असुन शेतकरी वर्गाकडुन गजबे यांचे सर्वञ कौतुक केले जात आहे. #Adharnewsnetwork #Chakkajammovement
साभार....