Top News

केवळ रामजी हरडे कृषि महाविद्यालय चामोर्शी येथील चतुर्थ वर्गाची विद्यार्थिनी कोमल तेलसे शेतकऱ्यांच्या बांधावर. #Pombhurna

पट्टा पद्धतीने धान पिकांची लागवड करा:- कोमल बंडू तेलसे
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील फुटाना या गावी डॉ. पंजााबराव देशमुख कृषि विद्यापीठा अंतर्गत ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रेडी) या कार्यक्रमाद्वारे केवळ रामजी हरडे कृषि महाविद्यालय चामोर्शी येथील चतुर्थ वर्गाची विधार्थिनी कोमल बंडू तेलसे हिने फुटाना मोकासा या गावातील शेतकरी विलास कैकाडू राउत यांच्या शेतात पट्टा पद्धतीने धानाची लागवड करण्यात आली. #Pombhurna 

याप्रसंगी शेतकऱ्यांना पट्टा पद्धतीने लागवड करण्याचे फायदे, त्याची योग्य पद्धत, त्याला लागणारे व्यवस्थापन तसेच उत्पन्न वाढीसाठी करावयाचे उपक्रम या सर्व बाबींची सखोल माहिती त्यांना देण्यात आली. हे प्रात्यक्षिक महाविद्यलायाचे प्राचार्य डॉ. डी.जी. सुरजे , कार्यकारी प्रभारी किशोर गहाने, उपप्रभारी तुषार भंडारकर, अशिष वाढई, उषा गजबिये, छविल दुधबळे, आर. जे. चौधरी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यातत आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने