चोरट्यांकडून वृद्ध दाम्पत्यांना मारहाण करून केली चोरी. #Theft

Bhairav Diwase

आरोपी फरार; पोलिसांचा तपास सुरू.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- वृद्ध दाम्पत्यांना मारहाण करीत त्यांच्या तोंडावर उशी ठेवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांनी 19,000 हजार ऐवज घेऊन पसार झाल्याची घटना सावली तालुक्यातील चांदली बूज येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून सावली पोलिसांनी आपली तपास चक्के वेगाने फिरविली आहे. #Theft
सविस्तर वृत्त असे की दि. ०२/०८/२०२१ रोजी रात्रौ १०:०० वाजताच्या सुमारास कुसुमबाई मनोहर टेप्पलवार वय ७३ वर्ष व पती मनोहर टेप्पलवार वय ७८ वर्ष हे जेवन करुण दोघे घरात झोपले. रात्रौ अंदाजे ०१:०० वाजताच्या दरम्यान अचानक कुसुमबाई च्या तोंडावर एका माणसाने उशी घेऊन तोंड दाबला होता व एक जन दोन्ही हात पकडून दोरीने बांधले तसेच एका माणसाने पाया बांधले त्यात कुसुमबाई स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करित असतांना बाजूच्या बेडवर झोपलेले मनोहरराव ला सुद्धा एकाने पकडून ठेवल्याचे दिसले.
या दोघां वृद्ध दाम्पत्याना त्या चार लोकांनी पकडून ठेऊन ते लोक घरातील पैसे व दागिने कोठे आहेत, पैसे व दागिने काढून दिले नाही तर आम्ही तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देत मारहाण ही केले. त्यानंतर आलमारीकडे इशारा केला असता त्या चार मानसापैकी एकाने आलमारी उघडून आलमरीतील ठेवलेले चिलर पैशाचा डब्बा काढला तसेच त्यांच्या पैकी एकाने गादी एकडे तिकडे करुण गादीखाली ठेवलेले ८,००० रु व चिलर पैसे असे एकूण ८,५०० रु /- त्यांनी जबरजस्तीने काढून घेतले तसेच त्या चार लोकांपैकी एकाने कुसुमबाई च्या गळ्यात असलेला सोन्याचा मंगलसूत्र ३ gmचे व सोन्याचे २ चे कानातील बारी असा एकूण ५ gm चे सोन्याचे दागिने जबरजस्ती काढून घेतले व गादीवर ठेवलेला मोबाइल सुद्धा घेऊन तुम्ही पोलिस स्टेशन ला रिपोर्ट दिल्यास तुम्हाला व तुमच्या मुलांना मारून टाकू अशी देऊन ते पळून गेले.
काही वेळ हे दोन्ही वृद्ध दांपत्य बेशुद्ध होते त्यानंतर त्यांनी घराच्या शेजारी जाऊंन माहिती दिली. वृद्ध दांपत्य घाबरलेल्या अवस्थेत पाहून सावली रुग्णालयात दाखल करण्यात आले. व सावली पोलिस स्टेशनला माहिती दिल्याने ठाणेदार रोशन शिरसाट व अन्य पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले व तपास चालू केला.आज दिवसभर तपास सुरू होता पोलिसांनी श्वानपथक बोलवून तपास केला आहे. अज्ञात आरोपी वर गुन्हा दाखल केलेला असून सावली पोलीस तपास करीत आहे.