(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशनच्या दोन लाचखोर पोलीस शिपायांना लाच घेताना लाचलुचपत विभागाने 17 सप्टेंबरला रंगेहाथ पकडले. पोलीस शिपाई पंकज विठ्ठल चव्हाण ब. क. न 6093 वय 32 व पंकज विलास राठोड ब. क. न.5125 वय 32 अशी लाचखोर पोलीस शिपायाची नावे आहेत. #ACB
सविस्तर वृत्त असे की,आष्टी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पंकज चव्हाण व पंकज राठोड या दोन पोलीस शिपायांनी तक्रारदाराकडून दाखल गुन्ह्यामध्ये गाडी जप्त न करण्यासाठी व केसमसध्ये मदत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली.तक्रारदाराकडून आठ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 17 सप्टेंबर ला सापळा रचून या दोन पोलीस शिपायांना अटक करून गुन्हा दाखल केला. या कारवाईने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर क्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर ,अप्पर पोलीस अधिक्षक श्री मिलिंद तोतरे,पोलीस उपअधीक्षक श्री सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत राऊत, पो. हवालदार प्रमोद ढोरे, पोलीस नाईक सतीश कत्तीवार, देवेंद्र लोनबले, पो. शिपाई किशोर ठाकूर, महेश कुकुडकार,चालक तुळशीराम नवघरे,यांनी केली.