Top News

जिवती तालुक्यात मच्छरदाणी वाटपात घोळ. #Jivati

महिला शिवसेना झाली आक्रमक.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील नेहमीच चर्चेत असलेल्या पुन्हा एकदा प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण रुग्णालय चर्चेत आला आहे आज पल्लेझरी येथे आरोग्य सेवक किनाके यांनी मच्छरदाणी वाटप करण्यासाठी आलो होतो. यादी नुसार २४६ लोकांना मच्छरदाणी वाटप करायाची होती मात्र पाटण रुग्णालयाचे आरोग्य सेवक किनाके यांनी गावात २५ लोकांनाच मच्छरदाणी वाटप केलले आहेत. बाकीच्या मच्छरदाणी किनाके यांनी खाजगी कापड दुकानात विकले आहे अशा आरोप शिवसेना तालुका महिला संघटिका सिधुंताई जाधव यांनी केला आहे. #Jivati
 
तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यापासून अनेकजण सर्दी, ताप, खोकला, या आजाराने त्रस्त आहेत. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे जुलै, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही डेंग्यूचा कायम असून रुग्णांचा आकडा वाढत चाललाय रुग्णांचा आकडा वाढला आणि हिवताप रुग्णाचे संख्या वाढल्याने खाजगी शासकीय रुग्णालय हाउसफुल झाली आहे औषध फवारणी यंत्र उपलब्ध असूनही कोणत्याही प्रकारची उपाययोजना केल्या जात नाहीत डासांची संख्या खूप वाढली असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात आजारी पडल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य रामभरोसे झाले आहे.

पावसाळ्यामध्ये मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणामध्ये होत असून त्यापासून अनेक रोगांना निमंत्रण मिळत असते. त्यामुळे  त्यापासून आपला बचाव करण्यासाठी  पावसाळ्यामध्ये झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करावा यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिवती तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात मच्छरदाणी वाटप करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण कडे आज दोन महिन्यांपासून मच्छरदाणी धुळ खात पडलेल्या आहेत मात्र आरोग्य सेवक मच्छरदाणी वाटप करण्यासाठी तयार नाहीत.
याबाबत अनेकवेळा नागरिकांनी तसेच आमच्या मार्फतही अनेकवेळा प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथील संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना केल्या नंतरही त्याकडे मात्र गांभीर्याने लक्ष दिले गेलेले नाही. तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा या महत्त्वाच्या विषयाकडे प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण  लक्ष न दिल्यास तसेच डेंग्यू' नियंत्रणासाठी तातडीने योग्य ती पाउले न उचलल्यास शिवसेना तीव्र स्वरुपाचे शिवसेना स्टाईल मध्ये आंदोलन करेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने