(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभूर्णा:- राष्ट्रवादी महिला काँग्रेस पोंभूर्णा तालुका अध्यक्षपद काही दिवसांपासून रिक्त होते.तालुक्यात राष्ट्रवादी महिलाचे संघटन मजबूत करण्यासाठी व आगामी निवडणुकीत पुढील डावपेच आखण्या साठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा बेबीताई ऊईके यांनी नुकतीच देवाडा खुर्द येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या सोनाली भुरसे यांची पोंभूर्णा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम मागिल काही महिन्यापासून तालुक्यात झपाट्याने सुरू आहे. भाजपा , कांग्रेस, शिवसेनेचे अधिक प्राबल्य असतांना राष्ट्रवादी काँग्रेसने आपली वेगळी ओळख निर्माण करीत कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे. महिला तालुका अध्यक्ष सोनाली भुरसे यांच्या निवडीमुळे पक्षातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्षाची भूमिका व त्याची बांधणी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धेय्य, धोरणे व विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम नवनियुक्त पदाधिकारी यांना करावयाचे आहे.
नवनियुक्त अध्यक्षाच्या निवडीबद्दल जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिल्हा महिला अध्यक्ष बेबीताई ऊईके,तालुका अध्यक्ष विजय ढोंगे, कार्याध्यक्ष हिराजी पावडे,संजय पावडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.