Top News

बँक परिसरातून रक्कम लंपास करणारे चोरटे गजाआड. #Arrested


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- शहरातील अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या गांधी चौक परिसरातील बँक ऑफ इंडिया शाखेतून रक्कम काढून किराणा खरेदी करताना एका इसमाच्या खिशातून वीस हजार रुपये नगद चोरट्यांनी लंपास केला. याची तक्रार प्राप्त होताच गोंडपिपरी पोलिसांनी काल सापळा रचून दुपारच्या सुमारास दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. #Arrested
शहरातील बँक ऑफ इंडिया परिसरात नेहमीच वर्दळ असते. तर राष्ट्रीय कृत बँक म्हणून ओळखला जाणारा बँक ऑफ इंडियामध्ये अधिकाधिक खातेदारांची आर्थिक व्यवहार असल्याने खातेदारांच्या देवाणघेवाणीवर पाळत ठेवून त्यांच्या रोख रक्कम लंपास करण्याच्या घटना गेल्या दोन वर्षांमध्ये घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास तालुक्यातील किरमीरी येथील मारुती गणपती ठाकरे व 78 वर्ष यांनी नेहमीप्रमाणे खरेदीसाठी बँक ऑफ इंडिया शाखा गोंडपिपरी येथून 20000 रुपये रक्कम काढली व किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानात गेले.
याच दरम्यान पाळत ठेवणाऱ्या चोरट्यांनी त्यांच्या खिशातून रोख रक्कम लंपास केली. हे लक्षात येताच मारुती ठाकरे यांनी गोंडपिंपरी पोलीस स्टेशन गाठून याबाबत रितसर तक्रार नोंदविली. यावरून गोंडपिपरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चोरट्यांना पकडण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीअंती आरोपीची ओळख पटताच मध्यप्रदेश राज्यातील बाटूसिंग बिनुसिंग सिसोदिया वय 24 वर्षे राहणार बजरंगपुरा ता. जफालपुर जी. इंदोर व सहकारी एक अल्पवयीन बालक या दोघांना सापळा रचून अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा उलगडा सपोनि जीवन राजगुरू यांचे मार्गदर्शनात वंदीराम पाल ,माहुरकर, नासिर शेख यांनी कारवाईतून उघडकीस आणला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने