Top News

सगळे धोरणकर्ते/शासनकर्ते एका माळेचे मणी:- वैभव बाबा ठाकरे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी. #Chandrapur


चिमुर:- आज रद्द झालेली आरोग्य विभागाची भरती म्हणजे महाविकास आघाडीचे अपयश आहे. असला प्रकार हा आत्ताचाच नसून मागच्या आरोग्य भरती मध्ये असलाच प्रकार घडला होता. अगोदर भरती घोषित करायची, लोकांकडून टाळ्या वाजवून घ्यायचा, मोठी मोठी फीस वसूल करायची आणि परीक्षाच घ्यायची नाही किंवा रद्द करायची. असे करून राज्य सरकार बेरोजगार युवकांची फसवणूक करत आहे.
 आधीच्या सरकार च्या काळात महापरिक्षा घोटाळा झाला आणि आता आरोग्य भरती घोटाळा. म्हणजे अस म्हणायला हरकत नाही की लोकांचे आरोग्य दुरुस्त करता करता आरोग्य विभागच आजारी पडला की काय? सरकारने यावर लवकर प्रतिसाद देऊन गुन्हेगारांना अटक करावी व घोटाळ्याचे पाळेमुळे खोदून काढावे व बेरोजगार युवकांसोबतकचा होणारा आर्थिक, मानसिक छळ थांबवावा. अशी मागणी वैभव बाबा ठाकरे उपसरपंच ग्राम पंचायत आंबोली, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व तालुका अध्यक्ष ग्रामसंवाद सरपंच संघ यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने