Click Here...👇👇👇

यूपीएससीमध्ये सावलीच्या देवव्रतचा डंका. #Saolinews #Saoli

Bhairav Diwase
सावली वासीयांसाठी एक मानाचा तुरा.
चंद्रपूर:- युपीएससी सिव्हील सेवा परीक्षेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मागास समजल्या जाणाऱ्या सावली येथील देवव्रत वसंत मेश्राम याने देशातून 713 वी रँक पटकावत सावलीकरांच्या कॊतुकात मानाचा तुरा रोवला आहे. या यशाने सर्वसामान्य कुटुंबातील व प्राथमिक शाळेतील विध्यार्थीही अथक परीश्रम व सातत्यपूर्ण प्रयत्नाने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होता येऊ शकते हे दाखवून दिले. त्याच्या यशामुळे सावलीकरांची मान उंचावली असून त्याचे सर्वत्र कोतुक होत आहे.

🚨चंद्रपूरमध्ये पहिल्यांदाच तीन विद्यार्थी UPSC परीक्षेत उत्तीर्ण.

🚨कोरोना काळात मृत्युशी झुंज देत वरोराचा आदित्य जिवने UPSC परीक्षा उत्तीर्ण.

जिल्ह्यातून तिघे उत्तीर्ण.....

युपीएससी सिव्हील सेवा परीक्षेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून एकाचवेळी तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. चंद्रपूर येथील अंशूमन यादव (रँक २४२), वरोरा येथील आदित्य जीवने (३९३ रँक) व सावली येथील देवव्रत मेश्राम (७१३ रँक) असे या गुणवंत विद्यार्थ्यांची नावे आहेत.