🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

28 सप्टेंबर पासुन बल्लारपूर-नागभीड-गोंदिया रेल्वे पॅसेंजर सुरु होणार... #Railways

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
नागभीड:-रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. येत्या २८ सप्टेंबर २०२१ पासून बल्लारपूर-नागभीड-गोंदिया ही पॕसेंजर गाडी सुरू होणार आहे. नागभीड येथील रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती मिळाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च २०२० पासून ही पॕसेंजर बंद आहे. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर ही पॕसेंजर सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. पण रेल्वे प्रशासन ही पॕॅसेंजर सुरू करण्याचे नाव घेत नव्हते. परिणामी प्रवाशांना पदरमोड करून अन्य वाहनांनी प्रवास करावा लागत होता. अखेर प्रवाशांचा दबाव वाढल्यानंतर ही पॕॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून २८ सप्टेंबरपासून ही पॕॅसेंजर सुरू होत असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत