जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पेयजल मिळविण्यासाठी नागरिकांची चिखलातून फरफट. #Gondpipari

आरोग्याला धोका होण्याची शक्यता; प्रभाग क्र. 17 मधे नगरपंचायतीचे दुर्लक्ष.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये नागरिकांच्या पेयजल सुविधेसाठी अस्तित्वात असलेल्या कूपनलिकेच्या सभोवताल घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे प्रभाग वासियांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता बळावली आहे. तर्फे जल मिळवण्यासाठी नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागत असून स्थानिक नगर प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेनेचे आनंदराव गोहणे यांनी केला आहे.
शहरात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने अनेक प्रभाग वासियांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. यातच सध्या पावसाळी हंगाम सुरू असल्याने अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून शहर व तालुका परिसरात सात रोगाच्या लागणीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका संभवत असताना येथील प्रभाग क्रमांक 17 मध्ये पेयजलासाठी अस्तित्वात आणलेल्या कूपनलिकेच्या सभोवताल परिसरात घाणीचे साम्राज्य व चिखल तयार झाल्याने येथील नागरिकांना पेयजल व इतर वापरासाठी अत्यावश्यक असलेल्या पाणी मिळवण्यासाठी कमालीची फरपट करावी लागत आहे. तर कुपनलिके पर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना चक्क चिखलातून वाट काढावी लागत असून तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसून येते. असे गंभीर बाबीची तक्रार स्थानिक नगर पंचायतीच्या तत्कालीन पदाधिकारी व अधिकारी व कर्मचारी यांना कळवून हि सदर गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत टाळा टाळ केल्या जात असल्याचा आरोप शिवसेनेचे आनंदराव गोहणे यांनी केला असून नगर पंचायतीने नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत