जाहिरात... Advertisement... विज्ञापन

आमदारांपुढे मांडल्या गावातील समस्या. #Gondpipari

भं. तळोधी येथील नागरिकांनी दिले आमदारांना निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- तालुक्यातील भंगाराम तळोधी गाव विविध समस्यांनी ग्रासलेल आहे. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यासह विविध समस्या घेऊन भंगाराम तळोधीवासीय थेट राजुरा गाठून विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष भाऊ धोटे यांना निवेदन दिले.
आरोग्य, पाणी, रस्ते, आणि वीज, मानवाच्या २१ व्या शतकात देखील महत्वाच्या समस्या होऊन बसल्या आहेत. तालुक्यापासून काही किमी दूर असलेल्या भंगाराम तळोधी येथील नागरिकांच्या विविध समस्या आजतागाजत सुटल्या नाहीत.भंगाराम तळोधी येथील नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे.
या समस्यांना नागरिक कंटाळून आमदाराची भेट घेत गावातील रस्ते, वीज, पाणी व आरोग्य अश्या अनेक समस्यां या विषयी निवेदन देण्यात आले.
आमदार धोटे यांनी ग्रामस्थांच्या समस्यांना सकारात्मक प्रतिसाद देत येत्या काही दिवसात गावातील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.गावातील रस्ते,प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत असलेल्या अडचणी या विषय भंगाराम तळोधी येथील नागरिकांनी आमदार साहेबांशी चर्चा केली.गावातील रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली असून नागरिकांचा अपघात सुद्धा होऊ शकतो त्यामुळे वेळीच सावध होऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी येथील नागरिकांची मागणी होती.त्यामुळे कसलीही वाट न बघता थेट राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांची भेट घेतली आमदारांनी पुढील काही दिवसात हे काम केले जाईल असा शब्द यावेळी ग्रामस्थांना दिला.
या प्रसंगी काँग्रेच चे नेते श्रीनिवास कंदनुरीवार, माजी सरपंच निर्मलाताई निमगडे,अनिकेत दुर्गे,इंद्रपाल मेश्राम,चंदू दुर्गे, धनराज डोंगरे, चक्रपाणी दुर्गे,अशोक भारशंकर, शंकर ऊराडे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत