Click Here...👇👇👇

राष्ट्रवादी काँग्रेसला गोंडपिपरी तालुक्यात खिंडार. #Gondpipari

Bhairav Diwase
1 minute read
रायुकाँचे तालुकाध्यक्ष जयेश कार्पेनवार यांचा शिवसेनेत प्रवेश.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गोंडपिपरी:- रायुकाँचे तालुकाध्यक्ष आणि तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या भंगाराम तळोधी ग्रामपंचायतीचे ग्रा.पं.सदस्य जयेश कार्पेनवार यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. गोंडपिपरी येथिल स्थानिक विश्रामगृहात शुक्रवार(दि.१७)असलेल्या बैठकीदरम्यान त्यांनी शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदिप करपे ,तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिर्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेचा दूपट्टा टाकला.#Adharnewsnetwork
   राष्ट्रवादीमध्ये तालुक्यात असलेल्या अंतर्गत कलहामूळे आपण शिवसेनेचे मार्ग धरल्याचे यावेळी जयेश कार्पेनवार याःनी सांगितले.यानंतर आपन शिवसेना पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून येणाऱ्या दिवसात विठ्ठलवाडा-भंगाराम तळोधी क्षेत्रातील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे सुतोवाच कार्पेनवार यांनी सांगितले आहे.यावेळी नरेंद्र इंगोले,रियाज कुरेशी, बळवंत भोयर,आनंदराव गोहणे, बालू झाडे,संतोष चीलंनकर,ओमप्रकाश मडावी, वंदेश तेलसे,शुभम भोयर यांची उपस्थिती होती.#Gondpipari