पोंभूर्णा शिवसेना तालुका प्रमुखपदी आशिष कावटवार. #Appointment

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभूर्णा:- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्या सुचनेनुसार चंद्रपुर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांनी पोंभुर्णा तालुका प्रमुख पदी आशिष कावटवार यांची नियुक्ती केली.
आशिष कावटवार हे विद्यार्थी दशेपासुन शिवसेनेशी एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करीत होते. भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख,युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी घेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नाना घेऊन अनेक आंदोलने केली आहेत.
पोंभूर्णा तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी गावागावात अनेक समाजहितैषी कामातून शिवसेनेचे प्राबल्य निर्माण केले आहे. यामुळेच भाजपाची तालुक्यात लाट असतांनाही ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश प्राप्त झाले. येणाऱ्या पुढील जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगर पंचायत निवडणुकाचे वेध लक्षात घेता शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिर्हे यांच्या शिफारसीने तालुका प्रमुख पदी आशिष कावटवार यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.
पक्षाचा प्रचार व प्रसार जोमाने करतील अशी अपेक्षा यावेळी करण्यात आली असून नियुक्ती पत्र देताना शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे,शिवसेना शहर प्रमुख गणेश वासलवार,किशोर डाखरे,सह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.