कोंढा येथे माती परीक्षण कार्यक्रम. #Program

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- डॉं. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थिनी कृषिदूत ऋतू पेटकर हिने ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत भद्रावती तालुक्यात कोंढा येथे शेतकऱ्यांना आपली शेती करताना आर्थिक व अपव्यय खर्च कसा कमी करता येईल व रासायनिक खताचा वापर कसा कमी करता येईल यासाठी आपल्या जमिनीची तपासणी म्हणजेच माती परीक्षण करून आपल्या शेतीला नेमके कोणते कन्टेन्ट कमी आहेत व कोणते आपल्याला घटक आवश्यक आहे यासाठी त्यांना त्यांच्या शेतावर जाऊन माती परीक्षण करीता माती कोणत्या कोणत्या ठिकाणची घ्यायची आणि परीक्षणाकरीता कोठे पाठवायचे यांचे संपूर्ण शास्त्र शुद्ध माहिती बांधावर जाऊन दिली या कार्यक्रमाकरिता विजय मते पाटील (शेतकरी) बापूराव चामाटे (शेतकरी) यांनी सहकार्य करून या उपक्रमास सहकार्य केले.

अशा प्रकारे हा कार्यक्रम प्राचार्य डॉं. आर.अ. ठाकरे सर, उपप्राचार्य श्री. एम. बी .कडू सर, कार्यक्रम अधिकारी शुभम सरफ सर, व विषय तज्ञ प्रणिता चौरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.#Program