पुरात वाहुण गेलेल्या आबेंझरी येथिल पिडीत कुटूबीयांची विदर्भ राज्य आंदोलन समितीनी घेतली भेट. Jivati


जिवती:- जिवती तालुक्यातील आबेंझरी येथिल वयोवृद्ध सिताराम कोरागें वय (६५) यांनी दिनांक 29/08/2021 रोज रविवारला आपल्या शेती कामाकरीता सुमारे ३.३० च्या सुमारास शेतात गेले असता अचानक वारा वादळी सह मुसळधार पाऊस सुरु झाल यात वयोवृद्ध सिताराम कोरागें यानी आपल्या बैलाला सोडुन घराकडे परतले असता शेतीलगतच्या नाल्याला पुर आल यात वयोवृद्ध सिताराम कोरागें पाण्याच्या पुरात वाहत सुमारे 200 मी. वर त्यांचा पार्थीव शरीर मिळाल या घटनेची त्वरित दखल घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हाध्यक्ष सुदामभाऊ राठोड यांनी पिडीत कुटूबीयांची भेट घेऊन दिलासा दिला यात घटणा घडल्यापासुन ते आतापर्यंत पिडीत कुटूबीयांची विदर्भ राज्य आंदोलन समिती व्यतिरिक्त कोणत्याही शासकीय अथवा लोक प्रतिनीधीनी आमची भेट घेतली नसल्याचे पिडीत कुंटूबीयानी आरोप केला आहे.
तत्काल 25 लाखाची आर्थीक मदत देण्यात यावी अशी मागनी विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हाध्यक्ष सुदामभाऊ राठोड यांनी आमच्या प्रतिनीधी च्या माध्यमातुन शासनाकडे केली आहे या वेळी मानीकराव कोरागें नागनाथ कोरागें लक्ष्मीबाई कोरागें विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हाध्यक्ष सुदामभाऊ राठोड जिवती तालुका अध्यक्ष सुनिल राठोड रामेश्वर पोले रामचंद्र सलगर दत्ता भाऊ आदिची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत