Top News

गोंडपिपरी येथे पोषण अभियानाला सुरुवात.#Campaign



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- राज्यात कोरोणाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर सरकारकडून संभाव्य तिसरा लाटे बद्दल खबरदारी व उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा तिसरा लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांवरील असल्याने शासनाकडून लहान मुलांच्या पोषण आहारा बद्दल जनजागृती आणि मार्गदर्शन केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण आहार अभियान सर्व स्तरावर राबविला जात आहे.महिनाभर चालत असलेल्या या अभियानाचे चार हप्ते पाडण्यात आलेले असून प्रत्येक हप्त्यात विविध उपक्रम राबविल्या जात आहे. लहान मुलांकरिता योग्य पोषण आहार दिल्याने मुलांची रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत होणार आहे. तसेच या अभियाना दरम्यान गरोदर माता आणि नागरिकांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे.तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता चंद्रपूर जिल्हा परिषदेकडून लहान मुलांची आणि गरोदर मातांची विशेष काळजी घेतली जाणार आहे.
लहान मुलांनी व गरोदर मातांनी रोज कोणता आहार घ्यावा याचा डायट प्लान दिला जाणार आहे.यात गाजर बीट अशी कंदवर्गीय पिके मेथी पालक आणि इतर पालेभाज्या, फळे भाज्या, ताजी फळे याचा समावेश असणार आहे गावागावात जाऊन ही जनजागृती अंगणवाडी सेविका आशा वर्कर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. मुलांना लोह आणि विविध प्रथिने मिळणारे खाद्य रोजच्या आहारात समाविष्ट करण्याकरिता भर दिला जाणार आहे. कुणीही वंचित राहू नये याकरिता ग्रामसेवक व आशा वर्कर यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लहान बालकांची दैनंदिन नोंद घेतली जाणार आहे.#Adharnewsnetwork
आजच्या युगात विविध प्रकारची खते रसायन आणि दूषित हवेमुळे कॅन्सरचे प्रमाण सुद्धा दिवसागणिक वाढत आहे रासायनिक खतांचा आणि कोणत्याही फवारणी चा वापर न करता परस बागेत भाजीपाला पिकवावा या संदर्भातले मार्गदर्शन केल्या जाणार असून या माध्यमातून जिल्हा कॅन्सर मुक्तीचा सुद्धा संकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी पारखी यांनी सांगितली आहे.या अभियानाचा शुभारंभ काल गोंडपिपरी येथून करण्यात आला असून संपूर्ण महिनाभर हे अभियान राबविले जाणार आहे.#Campaign

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने