Top News

कोरोनामुळे रद्द झालेल्या रेल्वे पॅसेंजर गाड्या त्वरित सुरू करा; माजी आमदार अँड संजय धोटे यांची मागणी. #Railway

माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वात दक्षिण रेल्वेचे महाप्रबंधक यांची भेट घेऊन शिष्टमंडळाद्वारे केली मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील तेलंगणा सिमेच्या जवळ असलेल विरुर स्टेशन हे गांव,या गावाभोवती अनेक गावाचा संपर्क असून येथील गावालगत अनेक अनेक गावाचा समावेश होतो,विरुर येथे रेल्वे स्टेशन अस्तित्वात असून,त्यांचा फायदा नागरिकांना होण्याचे चित्र दिसत नाही नव्हते,कारण या रुळावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्या कोविड 19 मुळे रद्द झाल्यामुळे या स्टेशन वर थांबत नसल्यामुळे विरुर तसेच परिसरातील नागरिकांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे,ही मागणी लक्षात घेता राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण रेल्वेचे महाप्रबंधक श्री गजानन माल्या यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.#Adharnewsnetwork


यावेळी माहिती देताना माजी आमदार अँड संजय धोटे म्हणाले की ,या मार्गावर जाणाऱ्या रामगिरी पॅसेंजर,भाग्यनगर पॅसेंजर तसेच अजनी पॅसेंजर या रेल्वे गाड्या या मार्गावर धावत असून कोविड 19 मुळे या गाड्या रद्द झाल्या असून तात्काळ सुरू करण्यात यावे व इंटरसिटी एक्स्प्रेस गाडी नंबर 02771 ही गाडी सिकंदराबाद ते रायपूर व गाडी नंबर 02772 ही गाडी रायपूर ते सिकंदराबाद या मार्गाने धावत असते या गाडीचा विरुर रेल्वे स्टेशनला थांबा मिळाल्यास येथील नागरिकांना सोयीस्कर होणार आहे,यासर्व पॅसेंजर गाड्या कोरोना मुळे रद्द झाले असून आपण या गाड्या त्वरित चालू करावे,व इंटरसिटी एक्स्प्रेस चा थांबा विरुर रेल्वे स्टेशन इथे देण्यात यावा,


याअडचणी संदर्भात ही बाब येथील नागरिकांनी लक्षात आणून दिली,पॅसेंजर रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने चालू करण्यात या संदर्भात मागणी केली,विरुर स्टेशन येथील नागरिकांना सुरू झाल्यास येथील उद्योग वर्गांना तसेच व्यापारी बांधवाना यांचा फायदा होईल तसेच,रेल्वे थांबा मिळाल्यास नागरिकांना कमी पैश्यात प्रवास करता येईल व प्रवास सुखद राहील,भाग्यनगर पॅसेंजर गाडी नंबर 17233 ही गाडी सिकंदराबाद ते बल्लारपूर,व गाडी नंबर 17234 ही गाडी बल्लारपूर ते सिकंदराबाद ही गाडी रोज या मार्गावर धावत असते,तसेच रामगिरी पॅसेंजर गाडी नंबर 57121 ही गाडी काजीपेठ ते बल्लारपूर,व गाडी नंबर 57124 ही गाडी बल्लारपूर ते काजीपेठ या मार्गावर धावत असते,व अजनी पॅसेंजर गाडी नंबर 57135 ही गाडी काजीपेठ ते अजनी,व गाडी नंबर 57136 अजनी ते काजीपेठ ही गाडी सुद्धा या मार्गावर नेहमीत धावत असते,तसेच इंटरसिटी एक्स्प्रेस गाडी नंबर 02771 सिकंदराबाद ते रायपूर व गाडी नंबर 02772 रायपूर ते सिकंदराबाद या गाडीचा थांबा विरुर रेल्वे स्टेशन येथे देण्यात यावा,तसेच या सर्व रद्दझालेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू झाल्यास येथील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे,जनतेची मागणी लक्षात घेता या सर्व रेल्वे गाड्या लवकर सुरू करण्यासंदर्भात यावेळी त्यांनी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी दक्षिण रेल्वेचे महाप्रबंधक श्री गजानन माल्या यांच्या निदर्शनात आणून दिली यावेळी श्री माल्या यांनी याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे यांच्यासह भाजपाचे नेते सतीश कोमरपल्लीवार,भाजपचे विरुर स्टेशन शहर अध्यक्ष भीमराव पाला,भाजपाचे जेष्ठ नेते रमेश काकडे,भाजयुमो तालुका अध्यक्ष कोरपना रोहन काकडे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,ग्रामपंचायत सदस्य मोतीराम दोबलवार, भाजयुमो वि आ. तालुका महामंत्री छबीलाल नाईक, प्रदीप पाला आदी उपस्थित होते.#Railway

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने