जाहिरात... Advertisement... विज्ञापन

राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. #Rain

विदर्भातील बहूतांश जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट.
चंद्रपूर:- भारतीय हवामान विभागानं राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. हवामान विभागानं विदर्भातील बहूतांश जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट दिला होता. #Rain
त्याप्रमाणं विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.
IMD ने आज दिलेल्या इशा-या नुसार,पुढच्या 3,4 दिवसात राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता.ह्याचा सर्वाधिक प्रभाव मराठवाडा,मध्य महाराष्ट्र,कोकणात राहील. कोकणात काही ठिकाणी अतीवृष्टीची पण शक्यता. मुंबई,ठाणे,पालगर रायगड जास्त प्रभावीत राहिल.
चंद्रपूरमध्ये मुसळधार

चंद्रपूर शहर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. काल रात्री देखील शहरात जोरदार पाऊस बरसला होता. आज सकाळी मात्र स्वच्छ ऊन पडले असताना अचानक आकाश अंधारून आले. सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 74 टक्के एवढा पाऊस झालाय. धान पिकांसाठी अशा पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प देखील ओसंडून वाहण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
यवतमाळ मध्ये पावसाची रिप रिप

यवतमाळ शहरासह जिल्हाभरात आज सकाळपासून संततधार पावसाची रिप रिप सुरू होती. काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात हलका पाऊस झाला. संततधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसाने दिग्रस येथील अरुणावती धरणाची पातळी वाढली असून आज अरुणावती धरणाचे सात दरवाजे उघडण्याचा आले आहे. धरणात 97.87 टक्के एवढा जलसाठा जमा झालाय. पातळी मेन्टेन करण्यासाठी प्रती सेकंद 203 क्यूमेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. अरुणावती धरणात 97.87 टक्के पाणी वाढल्याने धरणाचे 7 दरवाजे उघडून प्रतिसेकंद 203 क्यु मेक प्रमाणे पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अरुणावती धरण परिसरात संततधार पाऊस सुरु असल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालीय. यामध्ये धरणाचे 11 दरवाज्या पैकी 1, 11,6 ,5,7,4 आणि 8 क्रमांकाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहे. अरुणावती नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे .
गडचिरोलीत पहाटेपासून मुसळधार

गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील दक्षिण भाग म्हणून असलेल्या अहेरी मुलचेरा चामोर्शी भामरागड एटापल्ली सिरोंचा या तालुक्यात सकाळी साडेदहा पर्यंत 15.5 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भर पावसातही काही भागात पेरण्या सुरू असलेले दृष्य यावेळी दिसले या पावसामुळे तेलंगणा राज्यात असलेल्या मेडीगट्टा धरणाचे 64 दरवाजे सोडण्यात आले आहे.या मेडीगट्टा धरणातून 5,73,443 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून गोदावरी प्राणहिता नदी काठावरील शेतीला पावसाचा फटका बसलेला आहे. जवळपास धोका पातळीच्या जवळजवळ हे नद्या वाहत असून असाच मुसळधार पाऊस सुरू असला तर शासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येईल.
अकोल्यात रात्रभर पाऊस

अकोला जिल्हातल्या पातूर तालुक्यातील आलेगाव परिसरामध्ये रात्रभर सतत पाऊस सुरू असल्यामुळे मळसुर ते आलेगाव रस्त्यावरील नाल्याला पूर आल्यामुळे आलेगावा सह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.पातूर तालुक्यातील आलेगाव मळसुर रस्त्यावर अनेक छोटे नाले आहेत थोडा जरी पाऊस झाला तर नाल्याचा पूर रस्त्यावरून वाहत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो. संपर्क तुटण्यामुळे,जिल्हा तालुका ठिकाणी आरोग्य व विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टीने मळसुर,सायवणी,उमरा,पांगारा,गावंडगाव,पांगरताटी, आदी गावच्या जनतेसह विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणी निर्माण निर्माण होत असतात. तरी मळसुर आलेगाव वाहतूक रस्त्यावर उंच मोठे पूल संबंधित प्राशासनाने तयार केले तर सदर समस्या मार्गी लागून विद्यार्थी व जनतेला मोठा दिलासा मिळू शकेल अशी मागणी गावकरी करत आहेत.
वाशिममध्ये सकाळपासून संततधार

वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपिर तालुक्यात सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. या संततधार पावसाने सोनाळा इथल्या सोनल प्रकल्प 100 टक्के तुडुंब भरला असून ओव्हर फ्लो झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळं प्रकल्पात धबधब्याचे स्वरूप आले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात कोसळला धो धो पाऊस

बुलडाणा जिल्ह्यात काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. तर उद्यासुद्धा जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. आज जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आलाय. अनेकांचे घरात पाणी घुसलंय या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेय. मोताळा तालुक्यात ही अतिवृष्टी झाल्याने नदीकाठच्या शेताचे नुकसान झालेय असून गावात पाणी घुसले होते आणि घरांचे मोठे नुकसान ही झालेय.. घाटाखालील खामगाव तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाला असून, पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेय.. खामगाव शहरातील नाल्याला पूर अलयाने 3 गायी वाहून गेल्याची माहिती आहे. #साभार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत