Click Here...👇👇👇

असाध्याला साध्य करण्याची ताकद फक्त शिक्षणामध्ये आहेः- डॉ. सुधीर हुंगे. #Pombhurna #teacherday

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- जीवन जगत असतांना आपल्याला दररोज नविन नविन परिस्थितीचा सामना करावा लागत असतो. आजचे युग हे तांत्रिक युग असल्याने आज शिक्षणाला खूप महत्व आहे. आज समाजामध्ये आणि आपल्या आयुष्यात वावरतांना आपले मानसिक संतुलन व्यवस्थित राखण्याचे शिक्षण हे एकमेव साधन आहे. #Pombhurna #teacherday

मानवी जीवनात शिक्षण एक महत्वाची यंत्रणा आहे, जी व्यक्ती सोबतच देशाच्या विकासाकरिता महत्वपूर्ण भूमिका बजावते. आज शिक्षण हे नवीन पिढीच्या उज्वल भविष्यासाठी एक महत्वपूर्ण घटक बनले आहे. त्याचप्रमाणे असाध्याला साध्य करण्याची ताकद फक्त शिक्षणामध्ये आहे असे चिंतामणी कॉलेज आॕफ सायन्स पोंभूर्णा येथे शिक्षक दिनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधीर हुंगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले. महाविद्यालयामध्ये 5 सप्टेंबर हा दिवस भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून महाविद्यालयात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सतीश पिसे, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुधीर हुंगे हे होते. कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर वैशाली मुरकुटे यांनी केले तर प्रास्ताविक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी केले. तर आभार डॉ. सुप्रिया वाघमारे यांनी मानले.
या दिवासाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंशासनाचा उपक्रम राबविण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी आवडीने सहभाग घेतला. हा कार्यक्रम गुगल मिटच्या माध्यमातून आभासी पद्धतीने घेण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.