Top News

बैल पोळ्याच्या दिवशी करण्यात आले गुरांचे लसिकरण. #Vaccinationcattle


देवाडा खुर्द गावात झाली होती अज्ञात संसर्गजन्य रोगांची लागण.

दहा गुरे ढोरांचा झाला होता मृत्यू.

(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द व रामपूर दिक्षीत या गावातील गुरे ढोरे अज्ञात संसर्गजन्य रोगाने ग्रस्त झाले होते.या रोगामुळे गावातील दहा जनावरे दगावली होती .बैल पोळ्याच्या तोंडावर जनावरे दगावत असल्याने पशूपालक चिंतेत होते. पशूविभागाच्या वतीने गावात तत्काळ लसिकरण कॅम्प घेण्यात यावे अशी मागणी सरपंच विलास मोगरकर यांनी केली होती. बैलपोळ्याच्या दिवशी देवाडा खुर्द गावात पशूविभागाच्या वतीने लसिकरण करण्यात आले. #Vaccinationcattle

बैल पोळ्याच्या तोंडावर देवाडा खुर्द गावात अज्ञात संसर्गजन्य रोगांची लागण. #Pombhurna 

देवाडा खुर्द व रामपूर दिक्षीत या गावातील जनावरांना अज्ञात संसर्गजन्य रोगांची लागण झाली होते. शेकडो गुरे ढोरे या आजाराने ग्रस्त होती. मागील दोन दिवसात गावातील दहा जनावरे दगावली आहेत.
पशुसंवर्धन विभागाकडून वेळेवर योग्य ते लसीकरण केल्या जात नसल्याची बोंब होती. गुरांना वेगवेगळ्या रोगांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या देवाडा खुर्द गावासह तालुक्यातील काही ठिकाणी जनावरांमध्ये खुरांचे संसर्गजन्य आजार प्रामुख्याने आढळून येत आहेत. गुरांना पाय व तोंड खुरी येण्याचे प्रमाण वाढले आहे. या आजारांचा परिणाम शेतीकामावर झाले होते.
अज्ञात संसर्गजन्य रोगामुळे जनावरे दगावत असल्याने शेतकरी व पशूपालक चिंतेत होते. त्यामुळे देवाडा खुर्द गावचे सरपंच यांनी वरिष्ठांकडे लसीकरण करण्याची मागणी केली होती.त्याअनुषंगाने बैल पोळ्याच्या दिवशीच गावात लसिकरण कॅंम्प लावून १४० गुरांचे लसिकरण करण्यात आले.
-------------------------------------
देवाडा खुर्द गावातील जनावरांना अज्ञात संसर्गजन्य रोगांची लागण झाली होती . गावातील अनेक गुरे रोगाने ग्रस्त होते मागील दोन दिवसात दहा जनावरे दगावली होती त्यामुळे संबंधित विभागाकडे लसिकरण करण्याची मागणी केली होती.बैल पोळ्याच्या दिवशी गावातील गुरांचे लसिकरण करण्यात आले.
विलास मोगरकर, सरपंच
ग्रामपंचायत देवाडा खुर्द

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने