Top News

बैल पोळ्याच्या तोंडावर देवाडा खुर्द गावात अज्ञात संसर्गजन्य रोगांची लागण. #Pombhurna


दहा गुरे ढोरांचा झाला मृत्यू
(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर 
पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द व रामपूर दिक्षीत या गावातील गुरे ढोरे अज्ञात संसर्गजन्य रोगाने ग्रस्त असून या रोगामुळे गावातील दहा जनावरे दगावली आहेत.बैल पोळ्याच्या तोंडावर जनावरे दगावत असल्याने पशूपालक चिंतेत असून त्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. पशूविभागाच्या वतीने गावात तत्काळ लसिकरण कॅम्प घेण्यात यावे अशी मागणी होत आहे. #Pombhurna

बैल पोळ्याच्या दिवशी करण्यात आले गुरांचे लसिकरण. 

देवाडा खुर्द व रामपूर दिक्षीत या गावातील जनावरांना अज्ञात संसर्गजन्य रोगांची लागण झाली आहे. शेकडो गुरे ढोरे या आजाराने ग्रस्त आहेत. मागील दोन दिवसात गावातील दहा जनावरे दगावली आहेत. #Adharnewsnetwork
पशुसंवर्धन विभागाकडून वेळेवर योग्य ते लसीकरण केल्या जात नसल्याने गुरांना वेगवेगळ्या रोगांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या देवाडा खुर्द गावासह तालुक्यातील काही ठिकाणी जनावरांमध्ये खुरांचे संसर्गजन्य आजार प्रामुख्याने आढळून येत आहेत. गुरांना पाय व तोंड खुरी येण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. या आजारांचा परिणाम गाय, म्हैस, बैल यासह वासरांनाही या तोंड व पाय खुरी रोगाने ग्रासले आहे.
गुरांच्या अरोग्याच्यादृष्टीने गावात लसिकरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे.
मागील दोन दिवसात या अज्ञात संसर्गजन्य रोगामुळे जनावरे दगावत असल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशूविभागाच्या वतीने गावात तत्काळ जनावरांचे लसीकरण करण्यात यावे अशी मागणी करित आहेत.
-------------------------------------
देवाडा खुर्द गावातील जनावरांना अज्ञात संसर्गजन्य रोगांची लागण झाली आहे. गावातील अनेक गुरे रोगाने ग्रस्त असून दोन दिवसात दहा जनावरे दगावली आहेत. पशूपालक चिंतेत असून त्यांचे फार मोठे नुकसान होत आहेत. पशूविभागाच्या वतीने गावात जनावरांच्या लसिकरणाचे शिबिर तात्काळ घेण्यात यावे.
विलास मोगरकर, सरपंच ग्रामपंचायत देवाडा खुर्द

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने