🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

शुल्लक कारणावरून पतीने केली पत्नीची हत्या. #Murder #death


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपूर:- विवाह म्हणजे सात जन्माची सोबत, जन्मोजन्मीचे अतूट बंधन, दोन जिवांचे मिलन आणि जर तो प्रेम विवाह असेल तर प्रेमाची फलश्रुती मानल्या जाते. प्रेम विवाह केल्यास दोन्ही जिव एकरूप होतात, त्यांचे आयुष्य सुखात जाते अशी युवकांची भावना असते आणि आपली प्रेयसी किंवा प्रियकर आपला जीवनसाथी व्हावा ह्यासाठी चक्क जन्मदात्या आई वडिलांचा, समाजाचा विरोध सुद्धा पत्करून, रुढी परंपरा मोडीत काढुन प्रेमी विवाह बंधनात बांधल्या जातात. आपला जोडीदार ज्याला आपण निवडले, ज्याच्यावर आत्यंतिक प्रेम केले तोच आपला रक्षणकर्ता असल्याची भावना कायम मनात असते.  #Murder #death 
मात्र त्यानेच आपल्या प्रेयसीचा, आपल्या बायकोचा घात केला तर? तोच तिच्या जिवावर उठला तर? आणि तेही शुल्लक कारणावरून. बल्लारपूर तालुक्यातील किन्ही गावात अशीच घटना उघडकीस आली असुन ह्या घटनेत 2 वर्षापुर्वी प्रेम विवाह करून संसारात रमलेल्या एका मुलीची आई असलेल्या युवतीला आपला जिव गमावण्याची पाळी आल्याची घटना घडली आहे
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील किन्ही गावातील रहिवासी मनोज सुरेश कन्नाके, ह्याने प्रेमविवाह करून सुषमा हिचा पत्नी म्हणुन स्विकार केला. 2 वर्षांच्या त्यांच्या संसारवेलीवर वर्षभरापूर्वी गोंडस फुल उमलले. मात्र 2 सप्टेंबरच्या रात्री पती-पत्नीमध्ये छोट्याशा कारणावरून जोरदार भांडण झाले. रात्री 11:30 दरम्यान भांडण सुरू असताना मनोज कन्नाके ह्याचे स्वतःवरील नियंत्रण सुटले व त्याने तिला अक्षरशः तिला लाथा बुक्क्यांनी तिला झोडपले. झालेल्या अमानुष मारहाणीमुळे सुषमा गंभीर जखमी झाली.
गंभीर जखमी सुषमाला चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, तीन दिवस उपचार घेऊन तिने मृत्यूशी एकाकी झुंज दिली मात्र 5 सप्टेंबरच्या रात्री 10:15 वाजता तिची झुंज थांबली, मृत्यूने विजय मिळविला.
कोर्टीमक्ता गावातील पोलीस पाटील अरुण बुच्छे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मनोज सुरेश कन्नाके याच्याविरुद्ध भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला असुन आरोपी मनोज कन्नाके ह्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमीझ मुलाणी करत आहेत.